राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथे चैतन्य भाऊ मित्र मंडळाच्या वतीने दादर चौपाटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते

कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर मधील चैतन्य मित्र मंडळ यांच्या वतीने मुंबई दादर चौपाटी येथे भोजनाचे आयोजन करण्यात आले होते
६ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या संख्येनेभीम अनुयायी येथे असतात त्यांच्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून हा एक सुंदर उपक्रम चैतन्य भाऊ मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंबेडकर अनुयायांना त्यांच्या परीने होईल असे अन्नदानाची व्यवस्था केली होती. आपण समाजाचे काहीतरी देणे घेणे लागत आहे,म्हणून हा एक छोटासा उपक्रम राबविण्यात आला आहे, त्यांनी दादर चैत्यभूमी वर उपक्रमास बहुसंख्य आंबेडकरवादी अनुयांनी यांनी लाभ घेतला
एवढ्या वर्षात आम्ही येथ पर्यंत पोहोचलोय.ही खऱ्या अर्थाने महामानवांची प्रेरणादायक विचारसरणी आहे.ती अविरत चालत रहावी.
आपल्या प्रगती बरोबरच समाजबांधवांना पण
एक हात मदतीचा
देऊन त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गरजेचे आहे.
समाजकारण, धम्मचक्र गतीमान करण्याचे कार्य, सामाजिक शिस्त, समाजाचे एकत्रीकरण, राजकीय वारसदार होण्याचे कार्य, राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा निर्माण करण्याचे कार्य असे अनेकविध कार्य आपणास करायचे आहे.
आजच्या दिवशी आम्हास हे कार्य करुण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली अर्पण कल्यासारखे वाटत आहे असे मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री चैत्यन्य भाऊ आल्हाट यांनी सांगितले